शैक्षणिक
एचएससी परीक्षेत नेहरू कॉलेजचा यशस्वी झेंडा; विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
By nisha patil - 2/5/2026 5:15:05 PM
Share This News:
कोल्हापुरातील नेहरू ज्युनिअर कॉलेजची उज्वल कामगिरी; दोन्ही शाखांमध्ये उच्च निकाल
दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने एच.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९४ टक्के, तर कला शाखेचा निकाल ९२ टक्के लागला आहे. कला शाखेमध्ये कुमारी पटेल स्वालेहा जमीर (७७.१७%) हिने प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी पठाण मुस्कान नवाज (७६.१७%) द्वितीय, तर कुमार उस्ताद आयान समीर (७५.८३%) तृतीय क्रमांकावर राहिले.
विज्ञान शाखेत कुमारी मुजावर सादिया रफिक (७२.६७%) प्रथम, कुमार कागवाडे अमन सलीमजावेद (७०.५०%) द्वितीय, तर कुमारी मणेर आयेशाकौसर बद्रुद्दीन (६१.६७%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
या यशासाठी संस्थेचे चेअरमन मा. गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष मा. आदीलभाई फरास, शाळा समिती चेअरमन रफिक शेख, तसेच संचालक मंडळातील हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, पापाभाई बागवान, हाजी जहांगीर अत्तार, मलिक बागवान यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापक श्री. काझी एस.एस., तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले
कोल्हापुरातील नेहरू ज्युनिअर कॉलेजची उज्वल कामगिरी; दोन्ही शाखांमध्ये उच्च निकाल
|