बातम्या
किरकोळ वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्यावर बांबूने हल्ला; जखमी झाले दाम्पत्य
By Administrator - 10/13/2025 4:58:49 PM
Share This News:
किरकोळ वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्यावर बांबूने हल्ला; जखमी झाले दाम्पत्य
कोल्हापूर – किरकोळ वादामुळे सदर बाजार येथील गवळी गल्लीत शनिवारी (११ ऑक्टोबर) सकाळी गंभीर हल्ला घडला. दिलीप वामन कवडे (वय ४७, रा. सदर बाजार) आणि त्यांच्या पत्नीवर शेजारी अमोल साळोखे यांनी अचानक घरी घुसून बांबूने हल्ला केला. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. जखमींनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अमोल साळोखे याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहेत.
किरकोळ वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्यावर बांबूने हल्ला; जखमी झाले दाम्पत्य
|