बातम्या
नेमळे येथे भीषण अपघात; दोन महिला ठार, तिघे गंभीर जखमी....
By nisha patil - 6/22/2026 11:26:14 PM
Share This News:
नेमळे येथे भीषण अपघात; दोन महिला ठार, तिघे गंभीर जखमी....
सिंधुदुर्ग, ✒️गवस शुभम :मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. गोव्यातील गिरी येथून कणकवली तालुक्यातील भिरवंडेकडे जात असताना थार कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला.
या अपघातात श्रीमती नानोडकर (58, गिरी-गोवा) व विलासिनी सातार्डेकर (54, भिरवंडे-कणकवली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चालक सनी नानोडकर (36), उज्वला कांबळी (48) व पांडुरंग नानोडकर (65) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले.
स्थानिक ग्रामस्थ, पोलिस व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले. घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत.
नेमळे येथे भीषण अपघात; दोन महिला ठार, तिघे गंभीर जखमी....
|