बातम्या

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या नेर्लेकरला 20 महिन्यांच्या शोधानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक

Nerlekar who cheated investors

By nisha patil - 10/13/2025 5:30:09 PM
Share This News:

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या नेर्लेकरला 20 महिन्यांच्या शोधानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक

हुपरी-शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याच्या प्रकरणी 48 वर्षीय राजेंद्र भीमराव  नेर्लेकर याला सोमवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. जानेवारी 2024 पासून तो बेपत्ता असल्याचे नोंद असून, त्याच्या पत्नीने हुपरी पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्तेची फिर्याद दिली होती. नेरलेकरने “आम्हीच गुंतवणुकीवर जास्त परतावा देऊ” असा फसवे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर हुपरी-शाहूपुरीतच नव्हे तर आंध्र प्रदेशातही फसवणुकीचे प्रकरणे आहेत. डिसेंबर 2023 मध्ये हुपरीतील एका जैन मुनिचीही फसवणूक उघडकीस आली होती, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी नेरलेकर यांच्या घरासमोर उपोषण केले होते. अखेर 20 महिन्यांच्या शोधानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश मिळाले आणि नेर्लेकर ला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या नेर्लेकरला 20 महिन्यांच्या शोधानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक
Total Views: 53