बातम्या
नेसरीच्या उर्दू शाळेत बारावी पर्यंत वर्गवाढी कार्यक्रमाचे नेटके नियोजन*
By nisha patil - 6/14/2026 1:04:58 PM
Share This News:
**नेसरीच्या उर्दू शाळेत बारावी पर्यंत वर्गवाढी कार्यक्रमाचे नेटके नियोजन*
आजरा(हसन तकीलदार)*:-उर्दू विद्या मंदिर नेसरी ता. गडहिंग्लज येथे नववी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना मंजुरी मिळालेबद्दल वर्ग खोल्यांचे उदघाट्न पालक मंत्री प्रकाश आबिटकर आणि आम. शिवाजीराव पाटील यांचे हस्ते नुकताच संपन्न झाले.
उर्दू विद्या मंदिर नेसरी येथे पहिली ते आठवी पर्यंतच शिक्षणाची सोय होती पुढील माध्यमिक शिक्षणासाठी सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व त्रास पाहून भविष्याचा विचार करून नेसरी गावच्या सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष शहजाद वाटंगी आणि व्यवस्थापन कमिटीचे सदस्य यांनी सलग दोन वर्षे अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला त्याचबरोबर चंदगड -आजरा विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून शासनमान्य नववी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना मंजुरी मिळाली. या वर्गवाढी कार्यक्रमाचे उदघाट्न पालक मंत्री प्रकाश आबिटकर आणि आम. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे होत्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक मुबारक लाटकर यांनी केले तर सूत्रसंचालन युनूस नाईकवाडे व आयाज बागवान यांनी केले.
उदघाट्न प्रसंगी पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, बारावीपर्यंत वर्ग सुरु झालेने विद्यार्थ्यांना याचा पुरेपूर फायदा होणार आहे. पुढील काळात विज्ञान शाखेचा प्रस्ताव तयार करा त्याचीही मंजुरी घेऊ. त्याचप्रमाणे आपल्या मागणीनुसार शाळेसाठी खेळाचे मैदान तयार करूया आणि या कार्यक्रमासाठी मी नक्की येईन असे सांगितले.
आम. शिवाजीराव पाटील म्हणाले की, गावच्या सरपंच सौ. शिंदे यांनी सलग दोन वर्षे माझ्याकडे पाठपुरावा केला आणि कोणत्याही जातीपातीचे राजकारण न करता शिक्षणासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज या तिन्ही तालुक्यासाठी नेसरी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी मेडिकल किंवा नर्सिंग कॉलेजसाठी प्रयत्न करा त्यात मी नक्की साथ देईन अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, अमर हिडदुगी, संतोष नागटिळक(गटविकास अधिकारी पं. स. गड.), नवलकुमार हाळबागोळ(गटशिक्षणाधिकारी पं. स. गड.), जीवजीराव शिंदे नेसरीकर (अध्यक्ष देवस्थान समिती, नेसरी),ऍड. हेमंत कोलेकर, मजीद वाटंगी(तंटामुक्ती अध्यक्ष), हारुण पिरजादे, रहुफ मुजावर, मोहसीन मालदार, परवेज मुल्ला, मोहसीन नुलकर, नेहा नुलकर, मिनाज शेख आदिजण उपस्थित होते. आभार आकिक कोणकेरी यांनी मानले.
नेसरीच्या उर्दू शाळेत बारावी पर्यंत वर्गवाढी कार्यक्रमाचे नेटके नियोजन*
|