शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘न्यूरोलॉजिकल विकारांवर’ प्रबोधनात्मक व्याख्यान
By nisha patil - 9/22/2025 3:02:27 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘न्यूरोलॉजिकल विकारांवर’ प्रबोधनात्मक व्याख्यान
कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये स्टाफ अकॅडेमी आणि आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “न्यूरोलॉजिकल विकार: कारणे, लक्षणे आणि उपचार” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर यांनी न्यूरोलॉजिकल विकारांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी दैनंदिन जीवनातील आहार, झोप, आचार, विचार आणि व्यायामाचे महत्त्व पटवून सांगत कारणे, लक्षणे व उपचारपद्धती साध्या व सोप्या भाषेत स्पष्ट केल्या. उपस्थित प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दैनंदिन जीवनातील अनुभवांवर आधारित उदाहरणांद्वारे दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी भूषविले. यावेळी IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी, स्टाफ अकॅडेमी समन्वयक प्रा. अविनाश गायकवाड, स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. एम. आय. मुजावर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बी. टी. दांगट यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘न्यूरोलॉजिकल विकारांवर’ प्रबोधनात्मक व्याख्यान
|