बातम्या

कोल्हापुरात एएनएसएसआय वेलनेसचे नवे केंद्र...

New ANSSI Wellness Center in Kolhapur


By nisha patil - 4/14/2025 3:42:25 PM
Share This News:



कोल्हापुरात एएनएसएसआय वेलनेसचे नवे केंद्र...

वेलनेस मध्ये आता शस्त्रक्रियेशिवाय उपचाराची नवकल्पना

कोल्हापुरात आता मणक्याच्या आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार शक्य झाले असून, अमेरिकेतील प्रसिद्ध एएनएसएसआय (American Non Surgical Spine Institute) वेलनेस क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच न्यू शाहूपुरीतील स्क्वेअर 9 मधील विनया क्लिनिकमध्ये झाले. हा सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर शहरातील शहरी, शेतकरी, कामगार वर्गात मणक्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून, चुकीची बसण्याची पद्धत, तासनतास संगणक व मोबाईलसमोर बसून काम, वजन उचलणे व व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत.

या पार्श्वभूमीवर, एएनएसएसआय वेलनेसचे हे नवे केंद्र कोल्हापुरकरांसाठी वरदान ठरणार आहे. येथे अमेरिकेच्या FDA मान्यताप्राप्त व पेटंटेड स्पायनल डी-कॉम्प्रेशन थेरपीच्या माध्यमातून मणक्याच्या डिस्कवरील दाब कमी करून नसांवरील ताण दूर केला जातो. या उपचारात कोणतीही शस्त्रक्रिया, औषधे किंवा इंजेक्शन न देता, नैसर्गिक उपचार क्षमतेला चालना देऊन रुग्णांना वेदनामुक्त केले जाते. आजवर ९०% रुग्णांना या उपचारांनी मोठा लाभ झाला आहे.

डॉ. पवन जाधव यांनी सांगितले की, “मुंबईतील आमच्या क्लिनिकमध्ये दररोज १०० पेक्षा अधिक रुग्ण येतात. कोल्हापुरात हे केंद्र सुरू केल्यामुळे स्थानिकांना जवळच दर्जेदार व प्रभावी उपचार मिळणार आहेत.”

क्लिनिकमध्ये ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या जागतिक तज्ज्ञ डॉ. जोसेफ कॅमाराटा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक डॉक्टर व फिजिओथेरपिस्ट कार्यरत असणार आहेत. विशेषतः पोलीस, पत्रकार, महापालिका कर्मचारी यांच्यासाठी ५०% सवलतीची योजना देखील राबवली जाणार आहे.

एएनएसएसआय वेलनेसचे सह-संस्थापक दिनेश दळवी म्हणाले, “कोल्हापूरमध्ये आमचा क्लिनिक सुरू करणे ही आमच्या प्रवासातील एक महत्त्वाची पायरी आहे. शस्त्रक्रिया टाळून उपचार देणाऱ्या प्रणालीमुळे अनेकांचे जीवन पालटले आहे.”

२०१२ साली स्थापन झालेली ही संस्था भारत व दुबईमधील १८ केंद्रांमार्फत कार्यरत असून आजवर ७००० पेक्षा अधिक रुग्णांना शस्त्रक्रियेशिवाय उपचार देऊन आराम दिला आहे. संस्थेचे ध्येय आहे – "शस्त्रक्रिया, औषधे व इंजेक्शन्सशिवाय वेदनामुक्त जीवन."


कोल्हापुरात एएनएसएसआय वेलनेसचे नवे केंद्र...
Total Views: 156