बातम्या
८ सप्टेंबरपासून नवीन MH51G दोनचाकी मालिका सुरु
By nisha patil - 3/9/2025 4:46:46 PM
Share This News:
८ सप्टेंबरपासून नवीन MH51G दोनचाकी मालिका सुरु
कोल्हापूर, दि. ३ : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी अंतर्गत हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांसाठी नवीन दोनचाकी MH51G ही मालिका ८ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे.
या मालिकेतील पसंती क्रमांकांसाठी अर्ज ८ व ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५ या वेळेत कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) यांनी दिली.
महत्त्वाच्या सूचना :
-
अर्जदार हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक.
-
अर्जासोबत मूळ रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडणे बंधनकारक.
-
डिमांड ड्राफ्ट फक्त DY REGIONAL TRANSPORT OFFICE, ICHALKARANJI या नावानेच असावा.
-
अर्ज व धनाकर्षावर अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, पसंती क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक.
-
एकापेक्षा जास्त मागणी झालेल्या क्रमांकांसाठी १० सप्टेंबर रोजी लिलाव घेण्यात येईल.
-
लिलावासाठी अर्जदार किंवा त्याचा प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहता येईल.
-
पसंती क्रमांक घेतल्यावर सहा महिन्यांत वाहन नोंदणी करणे आवश्यक, अन्यथा क्रमांक रद्द होईल.
८ सप्टेंबरपासून नवीन MH51G दोनचाकी मालिका सुरु
|