ताज्या बातम्या
कोल्हापूरमध्ये ‘बांसुरी फाईन डाईन’ची नवी शाखा — खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 10/31/2025 12:02:57 PM
Share This News:
कोल्हापूर : फुलेवाडी दत्त मंदिर परिसरात बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंट’*ची दुसरी शाखा गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दिमाखात सुरू झाली. या रेस्टॉरंटचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते झाले.
तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आणि हॉटेल मालक संघ अध्यक्ष सचिन शानबाग, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर, माजी अध्यक्ष उज्वल नागेशकर, आनंद माने, क्रीडा संघ अध्यक्ष के. पी. खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये पंजाबी, महाराष्ट्रीयन, तंदूर, चायनीज, कॉन्टिनेंटल अशा विविध पदार्थांची मेजवानी माफक दरात मिळणार आहे. तसेच एसी व ओपन गार्डन डायनिंग, बँक्वेट हॉल, चेंजिंग व फीडिंग रूम अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
उद्घाटन प्रसंगी रेस्टॉरंटचे भागीदार महेश पवार, विश्वास कळके, धर्मेश महेंदळे आणि दिपाली पवार उपस्थित होते.
कोल्हापूरमध्ये ‘वासुरी फाईन डाईन’ची नवी शाखा — खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन
|