बातम्या
सीपीआरमध्ये नव्या अधिष्ठात्याची धडक कारवाई — ३० डॉक्टरांना नोटिसा!
By nisha patil - 11/11/2025 5:20:16 PM
Share This News:
सीपीआरमध्ये नव्या अधिष्ठात्याची धडक कारवाई — ३० डॉक्टरांना नोटिसा!
कोल्हापूर | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सीपीआर) नव्या अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी रुजू होताच शिस्त मोहीम सुरू केली आहे. वेळेत न येणाऱ्या तब्बल ३० डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यात अनेक विभागप्रमुखांचाही समावेश आहे.
डॉ. भिसे यांनी बुधवारी मध्यरात्री दीड वाजता अचानक राऊंड घेतला. या वेळी झोपलेला सुरक्षारक्षक त्यांना दिसला. त्यानंतर त्यांनी विविध विभागांची पाहणी केली. पुढील दोन दिवस सकाळच्या राऊंडमध्येही त्यांनी अनेक डॉक्टर अनुपस्थित आढळल्याचे नोंदवले.
रुग्णांकडून "डॉक्टर वेळेत येत नाहीत" अशी तक्रार मिळाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. सीपीआरमध्ये डॉक्टरांची सेवेची वेळ सकाळी ८:३० ते दुपारी २ अशी निश्चित आहे. “या वेळेत सर्व डॉक्टर्स हजर असायलाच हवेत, कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,” असा इशारा डॉ. भिसे यांनी दिला आहे.
सीपीआरमध्ये नव्या अधिष्ठात्याची धडक कारवाई — ३० डॉक्टरांना नोटिसा!
|