राजकीय
कोल्हापूरच्या राजकारणात नवा भूकंप; राहुल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर?
By nisha patil - 7/31/2025 12:52:36 PM
Share This News:
कोल्हापूरच्या राजकारणात नवा भूकंप; राहुल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर?
हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने राहुल पाटील यांची उपमुख्यमंत्र्यांसोबत भेट; चर्चांना जोर
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सकाळी कोल्हापूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांनी सदिच्छा भेट घेतली. ही भेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने झाली असून, पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनीही भेटीत सहभाग घेतला. केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर, इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते
राष्ट्रवादी प्रवेशासाठी ऑगस्टमध्ये मोठा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती मिळत असून यामुळे कोल्हापूरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील विकासकामांबाबतही सविस्तर चर्चा झाली.
कोल्हापूरच्या राजकारणात नवा भूकंप; राहुल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर?
|