बातम्या
योगातून निरोगी जीवनाचा संदेश; न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
By nisha patil - 6/21/2026 7:42:55 PM
Share This News:
योगातून निरोगी जीवनाचा संदेश; न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
सिंधुदुर्ग ✒️गवस शुभम : न्यू इंग्लिश School, फोंडाघाट येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. "निरोगी वृद्धत्वासाठी योग" या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
योग दिनाचे महत्त्व विषद करून योग प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. योगशिक्षिका सौ. भोगले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास योग मार्गदर्शक दिलीप रावराणे, विजय नांदोडकर, मुख्याध्यापक पारकर, पर्यवेक्षक राठोड तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. लिपिक मिलिंद जाधव यांनी आभार मानले. महाराष्ट्र गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
योगातून निरोगी जीवनाचा संदेश; न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
|