बातम्या
आरक्षण सोडतीनंतर नवा सत्तासमीकरणांचा खेळ – इच्छुकांच्या स्पर्धेला नवी धार!
By nisha patil - 11/13/2025 4:41:57 PM
Share This News:
आरक्षण सोडतीनंतर नवा सत्तासमीकरणांचा खेळ – इच्छुकांच्या स्पर्धेला नवी धार!
आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. प्रभागरचना बदलल्याने अनेकांचा पत्ता कट, तर काहींचा नवा पत्ता उघडला आहे. कुणाची संधी वाढली, कुणाची कमी झाली, याचा सारीपाट पक्षांनी मांडला आहे. नवीन आरक्षणानुसार संभाव्य उमेदवारांची यादी नव्याने तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे.
खुल्या आणि खुल्या महिला गटांसाठी वाढलेल्या जागांमुळे इच्छुकांची रांग वाढली आहे. अनेकांनी प्रवर्गातून संधी न मिळाल्यास खुल्या गटातून मैदान गाठण्याची तयारी केली आहे. काहींनी पक्षांतर्गत संधान तर काहींनी मित्रपक्ष किंवा थेट विरोधकांच्या गोटात जाण्याचे पर्याय खुले ठेवले आहेत.
आता पक्षांसमोर सर्वात मोठे आव्हान — ताकदवान आणि खर्च करण्यास तयार उमेदवार निवडणे! काहींची नाराजी पत्करावी लागली तरी पक्ष "जिंकणारा चेहरा" शोधण्यात गुंतले आहेत. शांत राहिलेले आता सक्रिय झाले आहेत, नावं पुढे करण्याची चढाओढ सुरू आहे.
राजकारणात नव्या समीकरणांची, नव्या संधींची हीच वेळ — आणि कोल्हापुरातील प्रत्येक प्रभाग आता बनला आहे सत्तेचा रणांगण!
आरक्षण सोडतीनंतर नवा सत्तासमीकरणांचा खेळ – इच्छुकांच्या स्पर्धेला नवी धार!
|