राजकीय

करवीरमध्ये विकासाला नवे बळ : गावोगावी जनहिताच्या कामांचा शुभारंभ

New impetus to development in Karveer Inauguration of public welfare works in villages across the region


By nisha patil - 5/1/2026 4:44:38 PM
Share This News:



करवीर विधानसभा मतदारसंघातील खाटांगळे, म्हारूळ, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, गर्जन पैकी माळवाडी, शिंगणापूर, बालिंगा, पाडळी खुर्द, वाकरे आदी गावांमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांमुळे परिसरातील वाहतूक व दळणवळण अधिक गतिमान होणार असून शिक्षण, आरोग्य, प्रशासन व वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ व्हावे, त्यांना शहराप्रमाणे सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या शुभारंभ कार्यक्रमास पंचक्रोशीतील मान्यवर, स्थानिक पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या काही काळापासून करवीर विधानसभा मतदारसंघात सातत्याने गावोगावी विकासकामांची मालिका सुरू असून, या माध्यमातून शेकडो गावांमध्ये हजारो पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. रस्ते, सार्वजनिक सुविधा, आरोग्यसेवा व आवश्यक दैनंदिन सोयी-सुविधांचा विस्तार करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे.

विकासाचा हा प्रवाह भविष्यातही अखंडपणे सुरू राहणार असून, जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत ठाम निर्धाराने विकासाला गती देण्याचे काम सातत्याने सुरू राहील. मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता तो पूर्णपणे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


करवीरमध्ये विकासाला नवे बळ : गावोगावी जनहिताच्या कामांचा शुभारंभ
Total Views: 135