विशेष बातम्या
कोल्हापूरच्या रस्त्यांना नवा वेग! — ४०९ कोटींच्या दोन प्रस्तावांना हिरवा कंदील; आठ दिवसांत खड्डेमुक्त मोहीम सुरू
By nisha patil - 1/11/2025 4:53:53 PM
Share This News:
कोल्हापूरच्या रस्त्यांना नवा वेग! — ४०९ कोटींच्या दोन प्रस्तावांना हिरवा कंदील; आठ दिवसांत खड्डेमुक्त मोहीम सुरू
कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यांसह एकूण १६६ रस्त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेने तब्बल ४०९ कोटींचे दोन प्रस्ताव राज्य सरकार व ‘मित्रा’ योजनेअंतर्गत सादर केले आहेत. यातील पहिल्या प्रस्तावात २५० कोटींचे १४६ रस्ते, तर दुसऱ्या प्रस्तावात १५९ कोटींचे २० रस्ते करण्याचे नियोजन आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने डांबरी प्रकल्प भाडेतत्त्वावर घेऊन आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन महिन्यांत नवीन डांबरी प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार अमल महाडिक यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून रस्त्यांसाठी निधी देण्याची घोषणा केली.
दरम्यान, १४५ कोटींचा पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यात फ्लोमीटर, सेन्सर, पंप, उपसा केंद्रांचे आधुनिकीकरण आणि १३ मेगावॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.
याशिवाय, कचरा व्यवस्थापन, खुल्या जागांची नोंदणी, रिंगरोड, पार्किंगची समस्या, ड्रोन सर्व्हे आणि रंकाळा तलावातील प्रदूषण नियंत्रण अशा अनेक कामांना वेग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार, आठ दिवसांत शहरात बदल दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरच्या रस्त्यांना नवा वेग! — ४०९ कोटींच्या दोन प्रस्तावांना हिरवा कंदील; आठ दिवसांत खड्डेमुक्त मोहीम सुरू
|