बातम्या

UPI पेमेंटवर नवा नियम! २ हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४% MDR

New rule for UPI payments


By nisha patil - 9/16/2026 2:52:12 PM
Share This News:



UPI पेमेंटवर नवा नियम! २ हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४% MDR

 

 

UPI वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १५ ऑक्टोबर २०२६ पासून २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या काही पात्र व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४ टक्के Merchant Discount Rate म्हणजेच MDR लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, या शुल्काचा थेट भार ग्राहकांवर टाकता येणार नाही. म्हणजेच UPI ने पैसे देताना ग्राहकांकडून स्वतंत्रपणे MDR वसूल करता येणार नाही. आता हा MDR नेमका किती असेल, हे समजून घेऊया. १० हजार रुपयांच्या व्यवहारावर ०.४ टक्के म्हणजे ४० रुपये MDR. ५० हजारांच्या व्यवहारावर २०० रुपये. तर ७५ हजार रुपयांच्या व्यवहारावर ३०० रुपये MDR होईल. मात्र ७५ हजार रुपये आणि त्यापुढील पात्र व्यवहारांसाठी MDR ची कमाल मर्यादा ३०० रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे १ लाख रुपयांच्या व्यवहारावर गणितानुसार ४०० रुपये येत असले, तरी प्रत्यक्ष MDR कमाल ३०० रुपयेच असेल.आणि १० लाख रुपयांच्या व्यवहारावरही कमाल MDR ३०० रुपयेच राहील.

दरम्यान, व्यक्ती-ते-व्यक्ती म्हणजेच P2P UPI व्यवहार कोणत्याही रकमेचे असले तरी मोफत राहणार आहेत. लहान व्यापाऱ्यांसाठीही या बदलामध्ये काही सवलती आहेत. सरकारच्या माहितीनुसार, दरमहा १ लाख रुपयांपर्यंत QR कोडद्वारे मिळणाऱ्या पात्र UPI व्यवहारांवर MDR शून्य राहणार आहे. तसेच रेल्वे, दूरसंचार, विमा, इंधन आणि कृषी निविष्ठा यांसारख्या काही क्षेत्रांमध्ये २ हजार रुपयांपेक्षा जास्त पात्र व्यवहारांसाठी ०.४ टक्क्यांऐवजी प्रति व्यवहार ५ रुपयांचा निश्चित MDR लागू होईल. म्हणजेच, UPI व्यवहार सुरूच राहणार असले तरी व्यापारी व्यवहारांच्या शुल्करचनेत हा महत्त्वाचा बदल होणार आहे.
मात्र या शुल्काचा ग्राहकांकडून थेट आकार करता येणार नाही, हे विशेष महत्त्वाचं आहे.


UPI पेमेंटवर नवा नियम! २ हजारांवरील व्यापारी व्यवहारांवर ०.४% MDR
Total Views: 34