बातम्या
रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम : स्टेशनवर सामानाचे वजन तपासणी अनिवार्य
By nisha patil - 11/9/2025 11:17:21 AM
Share This News:
रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम : स्टेशनवर सामानाचे वजन तपासणी अनिवार्य
सोलापूर : आता रेल्वे प्रवास विमानशैलीत होणार आहे. प्रवाशांनी रेल्वेत चढण्यापूर्वी आपल्या सामानाचे वजन करून घ्यावे लागणार आहे. यासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक वजन तपासणी यंत्रे बसवली जात आहेत. मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
श्रेणीनुसार सामानाची मर्यादा
• एसी फर्स्ट क्लास : मोफत ७० किलो, कमाल १५० किलो
• एसी सेकंड क्लास : मोफत ५० किलो, कमाल १०० किलो
• स्लीपर कोच : मोफत ४० किलो, कमाल ८० किलो
• जनरल तिकीट : मोफत ३५ किलो, कमाल ७० किलो
मर्यादेपेक्षा जास्त वजन नेल्यास प्रवाशाला सहापट शुल्क भरावे लागेल. शुल्क न भरल्यास दंडही आकारला जाणार आहे.
सुरक्षेसाठी पाऊल
अनेक प्रवासी जास्त सामान घेऊन प्रवास करतात, त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो आणि सुरक्षेची समस्या निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी हा नवा नियम लागू करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
सुरुवातीला कानपूर सेंट्रल, मिर्झापूर, अलिगड, प्रयागराज जंक्शन आणि टुंडला या प्रमुख स्थानकांवर वजन तपासणी यंत्रे बसवली जात आहेत. पुढील काळात देशभरातील सर्व प्रमुख स्थानकांवर ही सुविधा सुरू केली जाईल.
रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम : स्टेशनवर सामानाचे वजन तपासणी अनिवार्य
|