शैक्षणिक
आदर्श गुरुकुल विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
By nisha patil - 6/20/2025 6:57:41 PM
Share This News:
आदर्श गुरुकुल विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
पेठ वडगाव (ता. हातकणंगले) : आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांना औक्षण करून विद्यालयात प्रवेश देण्यात आला.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे सर आणि सचिव-सौ. एम. डी. घुगरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर करत नविन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
प्रत्येक इयत्तेतील पुस्तक संचांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार श्री. एस. जी. जाधव सर यांनी मानले. यावेळी ग्रीन व्हॅलीचे मुख्याध्यापक व्ही. एस. डोईजड, प्रशासक एम. एच. चौगुले आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
- तारा न्यूज, विक्रम केंजळेकर (कोल्हापूर प्रतिनिधी)
आदर्श गुरुकुल विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
|