बातम्या
कागल येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाला नवनिर्वाचित पदवीधर आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांची सदिच्छा भेट
By nisha patil - 3/11/2026 11:42:57 PM
Share This News:
कागल येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाला नवनिर्वाचित पदवीधर आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांची सदिच्छा भेट
कागल प्रतिनिधी - अजित बोडके कागल: नवनिर्वाचित पदवीधर आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी आज कागल येथील काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस किसान कमिटीचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले व नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्राधान्याने वाचा फोडणार असून, शेतकरी, कष्टकरी आणि युवकांच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला बळ देण्याचे काम करणार आहे. कागल तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या.
यावेळी सागर कोंडेकर म्हणाले, हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयामुळे पदवीधर मतदारसंघात काँग्रेसला नवे बळ मिळाले आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व पदवीधरांचे प्रश्न सुटतील असा विश्वास आहे.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व किसान कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कागल येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाला नवनिर्वाचित पदवीधर आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांची सदिच्छा भेट
|