बातम्या
नवनिर्वाचित पुणे पदवीधर आमदार हर्षदा देशमुख जाधव यांचा कोल्हापूर जिल्ह्यात भेटीगाठींना वेग
By nisha patil - 3/11/2026 3:31:51 PM
Share This News:
नवनिर्वाचित पुणे पदवीधर आमदार हर्षदा देशमुख जाधव यांचा कोल्हापूर जिल्ह्यात भेटीगाठींना वेग
कागल प्रतिनिधी : अजित बोडके पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भेटीगाठींना वेग दिला आहे. निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करत विविध ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांच्या भेटी घेतल्या.
यावेळी कागल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार असून, बेरोजगार पदवीधर युवकांसाठी रोजगार, शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे पदवीधर निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले. यापुढेही जिल्ह्यातील पदवीधरांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार जाधव म्हणाल्या.
यावेळी भेटीगाठी प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट,पैलवान अभिजीत तापेकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गणेश चंद्रकांत नलवडे, पैलवान निलेश तरंगे, पोलीस निलेश कदम, अनिकेत पाटील, सुशांत तापेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पुणे पदवीधर आमदार हर्षदा देशमुख जाधव यांचा कोल्हापूर जिल्ह्यात भेटीगाठींना वेग
|