बातम्या

पुणे पदवीधरच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा जाधव-देशमुख यांचा कागलमध्ये आभार दौरा; सर्वांगीण विकासाचे आश्वासन

Newly elected Pune Graduates


By nisha patil - 4/11/2026 3:04:46 PM
Share This News:



पुणे पदवीधरच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा जाधव-देशमुख यांचा कागलमध्ये आभार दौरा; सर्वांगीण विकासाचे आश्वासन

कागल प्रतिनिधी : अजित बोडके मेतके / कागल : राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक असलेल्या कागलच्या स्वाभिमानी मतदारांनी स्व. मंडलिक साहेब, स्व. विक्रमसिंह राजेसाहेब घाटगे यांचे काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार जोपासत आणि महाराष्ट्राचे नेते आमदार सतीश उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या खंबीर पाठिंब्यावर आर्थिक अमिषाला न जुमानता मला प्रचंड मतांनी निवडून दिले. त्याबद्दल मी सर्व मतदारांची ऋणी आहे, असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदाताई जाधव-देशमुख यांनी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघातील आभार दौऱ्यानिमित्त महाविकास आघाडी घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने मेतके (ता. कागल) येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी पुढे बोलताना आमदार हर्षदा जाधव-देशमुख म्हणाल्या, पदवीधरांच्या प्रश्नांबरोबरच महिला, युवक-युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम योगदान देईन, असे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार ॲड. अनिल घाटगे, माजी सनदी अधिकारी, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे कागल तालुकाध्यक्ष ॲड. दयानंद ना. पाटील-नंद्याळकर हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सद्गुरु बाळूमामा व सत्यव्वादेवी ट्रस्टच्या वतीने आमदार हर्षदा जाधव-देशमुख यांचा साडी-चोळी देऊन तर प्रभाकर देशमुख यांचा घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठल पाटील, तानाजी गायकवाड, मलगोंडा पाटील, रोशन पाटील, हेमलता विठ्ठल पाटील, शिवाजी मेथे, कमल भामरे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अमर चौगुले, सोशल मीडिया अध्यक्ष सुशांत पाटील, पर्यावरण तालुका अध्यक्ष राजू शिंदे, अक्षय पाटील, कॉम्रेड आनंदा डाफळे, कॉम्रेड श्रीकांत चव्हाण (केनवडे), प्रकाश पार्टे, सचिन हंचनाळे, प्रवीण माळी, शंकर गुरव, पांडुरंग गुरव, कृष्णात मगदूम, अंबाजी जाधव (बेनिक्रे), अंबाजी कामते (अलाबाद), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश सावंत, लक्ष्मण माळी, महादेव कामते यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


पुणे पदवीधरच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा जाधव-देशमुख यांचा कागलमध्ये आभार दौरा; सर्वांगीण विकासाचे आश्वासन
Total Views: 10