बातम्या

नवनिर्वाचित डॉक्टरांनी गरीब रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कटिबध्द राहावे

Newly elected doctors should


By Administrator - 3/18/2026 12:49:56 PM
Share This News:



नवनिर्वाचित डॉक्टरांनी गरीब रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कटिबध्द राहावे
       
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
            
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा उत्साहत
        

कोल्हापूर, दि. १५: वैद्यकीय क्षेत्र हे सर्वात सेवाभावी आणि अनेकांना जीवनदान देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातील उच्च पदवी घेवून आपण डाँक्टर म्हणून बाहेर पडत आहात. जास्तीत जास्त डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात सेवा करावी. आपल्या हातून गरीब आणि सामान्य रुग्णांची सेवा व्हावी यासाठी कटिबद्ध रहा,असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
            
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम. डी.,  एम. एस.  या पदव्युत्तर पदव्यांच्या पदवीदान समारंभात  मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
        
 मुश्रीफ पुढे म्हणाले, शासकीय रुग्णालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण असतात आणि विशेष म्हणजे ते सामान्य कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. मुला-मुलींचे वस्तीगृह यासह स्वयंपाक व्यवस्था, अभ्यासिका यामध्ये कोठेही कमतरता भासणार नाही यासाठी दक्ष राहिलो‌. सामान्य माणसाला उपचाराची गरज पडली तर त्याला खाजगी रुग्णालयात जावं लागू नये यासाठी शासकीय रुग्णालयात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

 पी जे होतील तेच टिकतील..
आज केवळ एमबीबीएस होवून काहीही उपयोग नाही. पी. जी. होतील तेच टिकणार आहेत. अनेक शासकीय महाविद्यालयांमध्ये लिव्हर, किडनी, हार्ट ट्रान्सफार्म करण्याची सुविधा आहे पण तिथे तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे गरिबांच्या सेवेत अडचणी येत आहेत. त्यामुळे आज पदवी घेवून बाहेर पडणार्या डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात सेवा करावी, अशी अपेक्षाही मंञी श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
          
डॉक्टरांनी विश्वासाहर्ता जपावी... 
आपल्या फँमिली डॉक्टरांनी तुला काहीही होणार नाही, तु बरा होणार असे नुसते सांगितले तरी अनेकांना ५० टक्के बरं वाटायला लागते. तशी लोकप्रियता आणि विश्र्वासहर्ता टिकवावी, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले.
      
व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिता सैबनावार, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. भूषण मिरजे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
           
स्वागत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कांबळे यांनी केले.  प्रास्ताविक प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिता सैबनावार यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी मानले.


नवनिर्वाचित डॉक्टरांनी गरीब रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कटिबध्द राहावे
Total Views: 13