बातम्या
जनसुराज्य शक्तीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार
By nisha patil - 10/3/2026 5:09:10 PM
Share This News:
जनसुराज्य शक्तीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार
वारणानगर (ता. पन्हाळा) :- वारणानगर येथे जनसुराज्य शक्तीच्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत तसेच शाहूवाडी, पन्हाळा व हातकणंगले पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार डॉ. कोरे यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच शाहूवाडी, पन्हाळा आणि हातकणंगले पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकारचा भक्कम पाठिंबा आहे. गावपातळीवरील विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जनसुराज्य शक्तीचे सर्व सदस्य पुढाकार घेऊन कामे जलद गतीने पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह यशवंत पाटील (कोडोली), सर्जेराव दादा पाटील (शित्तूर वारुण), शोभा युवराज बेलेकर (कळे), स्नेहल केतन वेल्हाळ (आबार्डे), शितल प्रवीण यादव (कुंभोज), अनिरुद्ध केदारी रेडेकर (नूल) यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शाहूवाडी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य अमरसिंह नारायण खोत, प्रियांका तानाजी भोसले, राजेश पांडुरंग पाटील, सुरेश यशवंत पवार, पन्हाळा पंचायत समितीचे रणजीत शिवाजी शिंदे, मोहन शामराव चोपडे, मनीषा विश्वासराव पाटील, वैशाली शशिकांत आडनाईक, शोभा सुरेश पाटील तसेच हातकणंगले पंचायत समितीचे मुकुंद शंकरराव पाटील, मोहन रंगराव पाटील, कल्याणी राजवर्धन मोहिते यांचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जनसुराज्य शक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनसुराज्य शक्तीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार
|