बातम्या
कोल्हापूरमधील नवविवाहित दाम्पत्याचा गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू
By nisha patil - 6/17/2025 9:30:25 PM
Share This News:
कोल्हापूरमधील नवविवाहित दाम्पत्याचा गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाला आहे.
सागर सुरेश करमळकर (वय 32) आणि सुषमा सागर करमळकर (वय 26) अशी या नवदांपत्याची नावे आहेत. विवाहानंतरच्या नवलाईत आयुष्याची स्वप्ने उराशी बाळगून हे दाम्पत्य काही वेळापूर्वीच आंबोली येथे फिरून आले होते. रविवारी दुपारच्या सुमारास ते आंबोलीहून परतले, मात्र त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही.
फोन न उचलल्याने आणि नंतर पूर्णतः स्विच ऑफ झाल्याने त्यांच्या मित्र परिवाराला संशय आला. सोमवारी सकाळी काही मित्रांनी थेट घरी जाऊन पाहणी केली असता, घरात गॅसचा तीव्र वास जाणवत होता. दरवाजा उघडून पाहिल्यावर बाथरूममध्ये दोघांचेही मृतदेह आढळले. प्राथमिक अंदाजानुसार गॅस गिझरमधून गळती झाल्याने दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सागर करमळकरचा मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या जाण्याने अनेकजण सुन्न झाले आहेत. सागरच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.
कोल्हापूरमधील नवविवाहित दाम्पत्याचा गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू
|