विशेष बातम्या
महाराष्ट्राची किचन क्वीन ठरल्या कोल्हापूरच्या सौ. निलम बनछोडे — ‘बनाना रिंग्ज’ने जिंकले राज्याचे मन!
By nisha patil - 10/28/2025 9:19:21 PM
Share This News:
“महाराष्ट्राची किचन क्वीन ठरल्या कोल्हापूरच्या सौ. निलम बनछोडे — ‘बनाना रिंग्ज’ने जिंकले राज्याचे मन!”
कोल्हापूर | दि. ५ ऑक्टोबर २०२५ कोल्हापुरच्या पाककला क्षेत्रासाठी अभिमानाची बाब! सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ या राज्यस्तरीय पाककला स्पर्धेत कोल्हापूरच्या सौ. निलम बनछोडे यांनी विजेतेपद पटकावले आहे.

या स्पर्धेचे आयोजन निलम स्टील कंपनीतर्फे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, संभाजीनगर अशा १० शहरांमधील स्पर्धक महिलांनी यात सहभाग घेतला होता. कोल्हापूरमधून तब्बल १०० महिला या स्पर्धेत उतरल्या होत्या.

सुरुवातीला सौ. बनछोडे यांनी केलेल्या “हेल्दी गुलाबजाम” या अनोख्या पदार्थाने परीक्षकांची मने जिंकली आणि त्यांना कोल्हापूर विभागातून राज्यस्तरीय फेरीसाठी निवड मिळाली. अंतिम फेरी मुंबईतील JW मॅरियॉट या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडली.
तेथे सौ. बनछोडे यांनी सादर केलेल्या “बनाना रिंग्ज” या स्वादिष्ट आणि नाविन्यपूर्ण स्टार्टर डिशला पहिला क्रमांक मिळाला. यामुळे त्या ‘महाराष्ट्राची किचन क्वीन २०२५’ ठरल्या.
कार्यक्रमात अनेक नामवंत सेलिब्रिटी व निलम स्टील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध शेफ तुषार देशमुख यांनी परिक्षणाची जबाबदारी सांभाळली.
सौ. निलम बनछोडे यांनी यापूर्वीही जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि आंतरराज्य स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत. या विजयाने कोल्हापूरचे नाव राज्यभर झळकावले आहे. त्यांच्या मेहनतीला, कल्पकतेला आणि पाककलेवरील प्रेमाला सलाम!
महाराष्ट्राची किचन क्वीन ठरल्या कोल्हापूरच्या सौ. निलम बनछोडे — ‘बनाना रिंग्ज’ने जिंकले राज्याचे मन!
|