विशेष बातम्या
निमशिरगाव : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, जयप्रभा स्टुडिओची मागणी चर्चेत
By nisha patil - 7/18/2025 4:59:03 PM
Share This News:
निमशिरगाव : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, जयप्रभा स्टुडिओची मागणी चर्चेत
निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आमदार राजेश क्षीरसागर हे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असून जर त्यांना महामार्गासाठी जमीन हवी असेल, तर त्यांच्या मालकीची जयप्रभा स्टुडिओची जागा शेतकऱ्यांच्या नावावर करावी, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.
गावातून आधीच राष्ट्रीय, राज्य व जिल्हा महामार्ग, रेल्वे मार्ग आणि प्रस्तावित रस्ते जात असल्याने आणखी एक महामार्ग झाल्यास अनेक कुटुंबे भूमिहीन होतील, असा दावा करण्यात आला.
या विरोधादरम्यान शेतकऱ्यांनी गट नंबरसह विरोध दर्शवणारे फलक हातात धरून आंदोलन केले. ग्रामपंचायत सरपंच अश्विनी गुरव यांच्याकडे निवेदन देत मुख्यमंत्र्यांकडे पाठवले.
या वेळी शिवाजी कांबळे, शांताराम कांबळे, प्रदीप पाटील, विक्रम चौगुले, अजित पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
निमशिरगाव : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, जयप्रभा स्टुडिओची मागणी चर्चेत
|