राजकीय
पन्हाळा नगरपरिषदेचे आज नऊ नामनिर्देशक फॉर्म दाखल. तर नगराध्यक्ष निरंक
By nisha patil - 11/15/2025 11:00:17 AM
Share This News:
पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद, सार्वत्रिक निवडणूक २०२५ सदस्य पदांसाठी नामनिर्देशन नऊ दाखल, तर नगराध्यक्ष निरंक, नगराध्यक्ष बिनविरोध होण्याच्या दिशेने कारभारांची वाटचाल आहे. असे गावात चर्चा आहे. त्यामुळे जर नगराध्यक्ष बिनविरोध झाली तर अपक्ष लढून काय फायदा ? आपला वजीरच राजकारणात नसणार असे अपक्ष उमेदवारांमध्ये आज दिवसभरात चर्चा होती. तसेच अपक्षांची मोट बांधून जिल्ह्यातील कोणता नेता आपल्या पक्षात घेऊन या नगरपालिकेचा अध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न करतो का ? अजून हे गुलदस्त्यात आहे.वेळ फार पुढे गेलेली आहे.
तसेच जनसुराज्य पक्षाने अध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले आहेत. त्यामध्ये पण कोणाला तिकीट फायनल करण्यात आलेले नाही.
अशी माहिती सूत्रांकडून कळाली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सो,रूपाली रवींद्र धडेल,सो,रेखा विजय पाटील तर तोरसे यांच्या घरात सुद्धा नगराध्यक्ष या उमेदवारासाठी फॉर्म भरण्यासाठी मा.आमदार विनय कोरे यांनी सांगितले आहे. विरोधात एकमेव आहेत. ते सतीश भोसले यांच्या पत्नी सो, वेदांतिका सतीश भोसले,त्यामुळे ऐनवेळी जर विरोधकांन बरोबर काही उलटे-सुलटे झाले. तर नगराध्यक्ष बिनविरोध होणे नाकारता येणार नाही.अशी सुद्धा दिवसभरात चर्चा होती.
परंतु इच्छुक उमेदवार नी स्थानिक बँकेत ९० च्या आसपास निवडणूक साठी लागणारे खाते काढण्यात आले आहेत. सदस्य पण बिनविरोधच्या दिशेने जात होते परंतु ,अनेक अपक्ष उभारल्यामुळे हे बिनविरोध होणे आता शक्य नाही. तसेच जर जनसुराज्य पक्षाच्या विरोधात नगराध्यक्ष उभा केला तर या अपक्षाची साथ घेऊन अध्यक्ष होणार का ? याबाबत आज चर्चा होती. जनसुराज्य जे उमेदवार हे अपक्ष लढत आहेत. ते ८०% ते ९०% जनसुराज्य पक्षाचे आहेत.त्यामुळे हे सर्व अपक्ष जे उमेदवार आहेत.ते नाराज उमेदवार आहेत.आणि हे उमेदवार नगराध्यक्षाला विरोधात मतदान करणार का? काय पक्षाबरोबरच अध्यक्ष ला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष आता लागणार आहे.
जरी आज नऊ फॉर्म भरले असले तरी ऑनलाईन असल्यामुळे कमीत कमी आज २० च्या आसपास फॉर्म ऑनलाईन भरले गेले आहेत. ते उद्या नगरपरिषद मध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. परंतु सर्वच उमेदवार हे जनसुराज्य याच पक्षाकडून इच्छुक आहेत. त्यामुळे विरोधी गटाला काय करावे. हे सुचेना झाले आहे. तसेच मोकाशी यांचा शाहू विकास आघाडी पन्हाळा हा पक्ष आहे.आज त्यांनी तीन फॉर्म भरले आहेत. तर सहा अपक्ष फॉर्म आज नगरपरिषदेमध्ये जमा झाले आहेत. सर्वच उमेदवार जनसुराज्य पक्षात जाण्यासाठी इच्छुक आहेत.परंतु जनसुराज्यचे नेते काही लवकर मिटवताना दिसत नसल्यामुळे सर्व उमेदवार अपक्ष फॉर्म भरून पुढे जात आहेत.
आज नगरपरिषद मध्ये प्रभाग क्र. १ ब साठी (सर्वसाधारण) पोवार निखील सुभाष, तर प्रभाग क्र. ४ ब (सर्वसाधारण) पाटील सुरज मारुती, प्रभाग क्र. ७ गवळी प्रदीप प्रभाकर १ मुजावर रशिदा मन्सुर,प्रभाग क्र. ९ ब (सर्वसाधारण) १ मोकाशी असिफइकबाल रफिकअहमद २ मुजावर मुनाफ बाबासो प्रभाग क्र. १० अ (नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग) मुल्ला शबाना तौफिक प्रभाग क्र. १० ब (सर्वसाधारण) १ मुजावर शहाबाज शब्बीर, २ मुतवल्ली शकिल बालेखान असे एकूण नऊ नामनिर्देशक फॉर्म जमा झालेत. अशी माहिती माधवी जाधव-शिदे निवडणूक निर्णय अधिकारी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चेतनकुमार माळी यांनी माहिती दिली.
पन्हाळा नगरपरिषदेचे आज नऊ नामनिर्देशक फॉर्म दाखल. तर नगराध्यक्ष निरंक,
|