बातम्या

नव्वदी पार केलेल्या आजीने पूर्ण केले रमजान महिन्याचे रोजे

Ninetyyear old grandmother


By Administrator - 3/23/2026 3:02:47 PM
Share This News:



नव्वदी पार केलेल्या आजीने पूर्ण केले रमजान महिन्याचे रोजे
 

आजरा(ब्युरो):-आजरा दर्गागल्ली येथील रहिमत इस्माईल तकीलदार या नव्वदी पार केलेल्या आजीबाईंनी रमजान महिन्याचे रोजे पूर्ण केले. या वयातही आजीबाईंनी संपूर्ण महिन्याचे रोजे पूर्ण केल्याबद्दल कौतुक होत आहे.
     

रहिमतबी तकीलदार या साध्या निरक्षर गृहिणी आहेत. सामान्य कुटुंबात आपलं पूर्ण आयुष्य खंडाने केलेल्या शेतात राबत पती हयात असे पर्यंत पतीला साथ दिली. कष्टाला त्यांनी कधी पर्याय शोधला नाही. तीन मुले आणि दोन मुलींचा संसार त्यांनी व्यवस्थित सांभाळला.

आत्मसन्मान आणि सचोटीच्या तत्वावर त्यांनी आपले आयुष्य कंठीत करीत या वयातही आपले जीवन तडजोड न करता आपल्या शैलीत जगत आहेत. पूर्वीपासूनच त्या पूर्ण रमजान महिन्याचे रोजे पूर्ण करतात. आजपर्यंत त्यांनी कधीही रोजासाठी तडजोड केलेली नाही. आता नव्वदी पार करुन जवळ जवळ पंच्यान्नव गाठली तरी बोलण्याच्या, वागण्याच्या पद्धतीत बदल केलेला नाही. शरीर साथ देत नाही तरीसुद्धा अल्लाहवर असलेली असीम श्रद्धा त्यांचे रोजे पूर्ण करते असे ते म्हणतात. चतकोर भाकरी, आमटी, दही आणि एखादी भाजी एव्हढेच त्यांचे रोजचे आहार.

बाकी जादा काहीही खात नाहीत. आईस्क्रीम, बटाटे चिवडा, गुलाब जामून आणि एखाद मिरची भजी एव्हडेच कधीतरी जादा म्हणून खाल्ले तर. तरीसुद्धा एव्हड्याश्या भोजनावर त्यांनी आपले रोजे पूर्ण केले. प्रामुख्याने शाकाहारी त्यांचा आहार असून गोड लिंबू लोणचे,आंबा, माईनमुळा लोणचे आदींचा स्वाद घ्यायला आवडतो. पत्रकार हसन तकीलदार यांच्या त्या मातोश्री आहेत. आपल्या जीवनात त्यांनी कधीही तडजोड केली नाही की कुणासमोर झुकल्या नाही. स्पष्टवक्तेपणा, सचोटी आणि मेहनतीची हलाल कमाई यावर त्यांचा विश्वास आहे

. नव्वदी पार करुनसुद्धा त्यांनी पूर्ण केलेले रोजे हे आजच्या तरुण पिढीला एक मार्गदर्शक आदर्श आहे. तीस किंवा चाळीस गाठलेले शुगर, बी पी आदींचा हवाला देत रोजे राहणे टाळतात त्यांना हे एक मार्गदर्शक आहे. साधी जीवनशैली जगत ते आपले आयुष्य कंठत आहेत. आजतागायत त्यांनी अखंड आयुष्यभर रमजान महिन्याचे रोजे पूर्ण करीत आहेत. या वयातही त्यांनी महिन्याचे रोजे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.


नव्वदी पार केलेल्या आजीने पूर्ण केले रमजान महिन्याचे रोजे
Total Views: 153