बातम्या

*निवृत्ती गाजरगावकर यांचे प्राणांतिक उपोषण तात्पुरते स्थगित

Nivrutti Gajargaonkar


By nisha patil - 10/30/2026 11:09:01 PM
Share This News:



*निवृत्ती गाजरगावकर यांचे प्राणांतिक उपोषण तात्पुरते स्थगित
 

*तारा न्यूजचे मानले आभार
 

*आजरा(हसन तकीलदार):-मौजे मसोली ता. आजरा येथील गट नं. 169 चे मिळकती बाबत 7 वर्षापासून प्रलंबित असलेल्या निर्णयासाठी मसोलीचे निवृत्ती गजरगावकर यांनी आजरा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरु केले होते. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस होता. परंतु आज दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी  आजरा तहसील कार्यालयाने आठ दिवसात याबाबत निर्णय देण्याचे  लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे करण्यात आले आहे. आणि तेथील अधिकाऱ्यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले आहे.
   

तारा न्यूजचे आजरा प्रतिनिधी यांनी न्याय्य लढ्याचे सातत्यपूर्ण वार्तांकन करून लढ्याला यश आणल्याबद्दल तारा न्यूजचे यावेळी जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.


*निवृत्ती गाजरगावकर यांचे प्राणांतिक उपोषण तात्पुरते स्थगित
Total Views: 18