ताज्या बातम्या
शास्त्री नगर चौक येथे आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन..
By nisha patil - 7/27/2025 11:16:12 AM
Share This News:
शास्त्री नगर चौक येथे आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन..
नागरिकांनी लाभ घेण्याचे नियाज खान यांचे आवाहन
आज रविवार, दिनांक 27 जुलै 2025 रोजी, शास्त्री नगर चौक येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल, कोल्हापूर आणि असिफ खान फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत हे शिबिर भरवण्यात येत आहे.
सकाळी ८:४५ वाजता नागरिकांसाठी विविध तपासण्या सुरू होणार असून, या शिबिराचे औपचारिक उद्घाटन सकाळी ११ वाजता नगरसेवकनियाज असिफ खान यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” ही भूमिका घेऊन नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
शिबिरामध्ये खालील मोफत वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत:
🔹 ईसीजी तपासणी
🔹 रक्तातील साखर तपासणी
🔹 शारिरीक तपासणी
🔹 तज्ञ डॉक्टरांचा सल्ला
🔹 आवश्यक औषधांचे मोफत वाटप
यावेळी प्रा. जाहिदा खान यांचे विशेष योगदान असून, त्यांनी महिलांसाठी वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच माजी नगरसेवक नियाज खान यांच्या प्रेरणेने हा आरोग्य उपक्रम उभा राहिला आहे.
नियाज असिफ खान यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “या शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याच्या आवाहन या शिबिरा मार्फत करण्यात आले आहे.
शास्त्री नगर चौक येथे आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन..
|