बातम्या
रात्रभर रस्त्यावर; नियाज खान यांची खड्डेमुक्ती मोहीम!
By nisha patil - 5/6/2026 10:44:25 AM
Share This News:
रात्रभर रस्त्यावर; नियाज खान यांची खड्डेमुक्ती मोहीम!
जनतेसाठी जागा नगरसेवक; रात्रीच पॅचवर्क पूर्ण!
अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून काम करून घेतले; नियाज खान पुन्हा चर्चेत!
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी नगरसेवक नियाज खान यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यशैलीची छाप पाडली आहे. वाय. पी. पवार नगर ते जवाहर नगर तसेच महालक्ष्मी स्वीट ते हॉकी स्टेडियम या मार्गांवरील धोकादायक खड्ड्यांचे पॅचवर्क काम त्यांनी स्वतः रात्री उभे राहून पूर्ण करून घेतले.
पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नियाज खान यांनी कोणत्याही आदेशाची किंवा औपचारिकतेची वाट न पाहता थेट महानगरपालिका प्रशासनाशी पाठपुरावा केला. वारंवार सिटी इंजिनिअर यांच्याकडे पाठपुरावा करत अखेर रात्रीच्या वेळी पॅचवर्कचे काम सुरू करून घेतले आणि ते पूर्ण होईपर्यंत स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिले.
दिवस असो किंवा रात्र, नागरिकांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून नियाज खान यांची ओळख निर्माण झाली आहे. अनेक लोकप्रतिनिधी केवळ मागण्या करतात, मात्र नियाज खान यांनी प्रशासनाला काम करण्यास भाग पाडत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाची अंमलबजावणी करून दाखवली. त्यामुळे नागरिकांमधून त्यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक होत आहे.
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांमुळे अपघात किंवा गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत विशेष उल्लेखनीय ठरत आहे. रात्रभर जागून, अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आणि कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून त्यांनी प्रभागातील रस्ते दुरुस्तीचे काम पूर्णत्वास नेले.
"लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ निवडून आलेला सदस्य नव्हे, तर जनतेच्या अडचणी स्वतःच्या मानून त्यासाठी रात्रंदिवस झटणारा सेवक" याची प्रचिती नगरसेवक नियाज खान यांच्या कार्यातून पुन्हा एकदा प्रभाग १३ मधील नागरिकांना आली आहे. त्यांच्या या धडपडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, "काम करून दाखवणारा नगरसेवक" अशी त्यांची प्रतिमा अधिक बळकट होत आहे.
रात्रभर रस्त्यावर; नियाज खान यांची खड्डेमुक्ती मोहीम!
|