दीपावलीत गांधीनगर बाजारपेठेत विजेचे भारनियमन नको – करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
व्यापाऱ्यांच्या मागणीसाठी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक आणि रेडिमेड वस्तूंची केंद्रबिंदू ठरलेली गांधीनगर बाजारपेठ सध्या खरेदीदारांनी गजबजलेली आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेत विजेचे भारनियमन झाल्यास व्यापारावर परिणाम होऊ शकतो, म्हणून करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी दीपावली काळात विजेचे भारनियमन पूर्णपणे थांबवावे, अशी मागणी केली आहे.
या मागणीचे निवेदन सहाय्यक अभियंता विजय वसंत कोठावळे (गांधीनगर वीज वितरण कार्यालय) यांना करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले.
२४ तास खुली दुकाने – विजेची मागणी वाढली
शासनाने व्यापाऱ्यांना २४ तास दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने बाजारपेठ दिवसरात्र गजबजलेली आहे. रात्रीच्या वेळेसही खरेदीदारांची गर्दी वाढत असून, रस्त्यावर विक्री करणारे छोटे दुकानदारदेखील दिव्यांच्या उजेडात व्यापार करत आहेत. त्यामुळे सतत विजेची गरज भासत आहे.
शिवसेनेच्या मागण्या
शिवसेनेने निवेदनाद्वारे मागणी केली की —
-
दीपावली सणाच्या काळात कोणत्याही वेळेस विजेचे भारनियमन करू नये.
-
ज्या डीपींवर अतिरिक्त लोड आहे, त्या ठिकाणी जबाबदार कर्मचारी नेमावेत.
-
विज गेल्यास तात्काळ दुरुस्ती करून पुरवठा सुरू करावा.
-
उंचगाव ते वीटभट्टी परिसरातही अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करावा.
“सणासुदीच्या काळात व्यापार खंडित होऊ नये” – राजू यादव
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, “दीपावली सणामुळे दिवसरात्र ग्राहकांची रेलचेल सुरू आहे. अशा वेळी विज गेल्यास व्यापाऱ्यांना मोठा तोटा होईल. त्यामुळे अधिकारी सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात.”
⚙️ अधिकाऱ्यांचे आश्वासन
सहाय्यक अभियंता विजय कोठावळे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, दीपावली सणाच्या काळात गांधीनगर परिसरात विजेचे भारनियमन होणार नाही आणि विज गेल्यास तातडीने पुरवठा पुन्हा सुरू केला जाईल.
👥 शिष्टमंडळातील उपस्थिती
या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, ग्राहक सेना तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे, शरद माळी, गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, विभाग प्रमुख दीपक पोपटानी, विनोद रोहिडा, फेरीवाला संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव, उपशहर प्रमुख दीपक धींग, दीपक अंकल, शाखाप्रमुख सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, बाबुराव पाटील, रामराव पाटील, वसंत पोवार, लालचंद खुबचंदानी आदी शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते.