राजकीय
राजकारणासाठी नव्हे तर जनसेवेसाठी निवडणूक रिंगणात-रशीद पठाण
By nisha patil - 11/26/2025 1:58:58 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- आजरा नगरपंचायतीच्या रणधुमाळीमध्ये रंगत वाढतच चाललीय. प्रत्येकजण आपापल्यापरीने जनतेसमोर आपली भूमिका मांडताना दिसत आहे. प्रभाग क्र. 4 मधून तारराणी आघाडीचे उमदे आणि विश्वासू उमेदवार रशीद महमद पठाण हे रिंगणात उतरले आहेत. आमच्या प्रतिनिधीनी त्यांची मुलाखात घेतली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी रशीद पठाण म्हणाले की, मी ताराराणीच्या आघाडीतून राजकारणासाठी नव्हे तर समाजसेवेसाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहे. आजपर्यँत मी राजकारणातून समाजकारण करीत आलोय. जनतेच्या सेवेसाठीच मी उभा आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून असो किंवा नसो गोरगरिबांच्या हाकेला मी धावून जातच असतो. सर्वसामान्य गोर गरीब बंधू,भगिनी,माता प्रत्येकवेळी माझ्याकडे आशेने येतात. त्यावेळी मी त्यांची कामे करून देतो. रेशनकार्ड असो अथवा कोणत्याही सरकारी ऑफिसमधील कामासाठी मी स्वतः त्या ऑफिसपर्यंत पोहचून गोरगरिबांच्या समस्यांचे निराकरण करून कामे करून घेतली आहेत. वृद्धा पेन्शन योजना,इतर शासकीय सेवा सवलती मी गोरगरीब गरजू पर्यंत पोहचवण्याचे काम मी प्रेमाणिकपणे आणि निःस्वार्थपणे केले आहे. राजजकीय वातावरण मला नवखे नाही. याअगोदर मी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच जवाहर पत संस्थेमध्ये संचालक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. सद्या मी आजरा साखर कारखान्यात तज्ञ संचालकाची जबाबदारी पार पडतोय. ग्रामपंचायत सदस्य असताना जी कामे होत नव्हती ती कामे मी माझ्या पद्धतीने हाताळून लोकांची कामे पूर्ण केली आहेत. आज मी ज्या वॉर्डात उभा आहे त्या वॉर्डात मागील काळात कामेच झालेली नाहीत. रस्ता, गटारी आणि पाणीप्रश्न यासारखे भेडसावणारे प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या वार्डातून मला युवकांची साथ मिळत आहे. आमच्या आघाडीला जनतेतून चांगला पाठिंबा मिळत आहे हीच आमच्या विजयाची साक्ष आहे. सर्व मतदार बंधू भगिनींनी आपलं मत विकासाला द्या. शिटी या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राजकारणासाठी नव्हे तर जनसेवेसाठी निवडणूक रिंगणात-रशीद पठाण
|