बातम्या

गवतच दिसते चौहीकडे, गेला कालवा कुणीकडे?

Nothing but grass to be seen all around


By nisha patil - 9/21/2026 4:30:57 PM
Share This News:



गवतच दिसते चौहीकडे, गेला कालवा कुणीकडे?

कोट्यवधी रुपये खर्चून अस्तरीकरण झालेल्या मिणचे कुर कालव्याची दुरवस्था; डॉ. युवराज येडूरे यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न

भुदरगड | प्रतिनिधी भुदरगड तालुक्यातील मिणचे कुर कालव्याची दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून अस्तरीकरण करण्यात आलेल्या कालव्यात गवत वाढलेले दिसून येत असल्याने कालव्याच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संदर्भात डॉ. युवराज येडूरे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “कोट्यवधी रुपये खर्च करून कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले. मात्र आज कालव्यात गवतच दिसत असेल, तर हा निधी नेमका कशासाठी खर्च झाला, हा प्रश्न उपस्थित होतो. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणे हे कालव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु कालव्याची अशी दुरवस्था असेल, तर शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी कसे मिळणार?”

ते पुढे म्हणाले, “शासनाचा निधी हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे कालव्याच्या कामाची गुणवत्ता, निधीचा वापर आणि देखभाल याबाबत संबंधित विभागाने पारदर्शक माहिती द्यावी. कालव्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे.”

“शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नको, तर त्यांच्या शेतापर्यंत प्रत्यक्ष पाणी पोहोचले पाहिजे. कालव्याच्या दुरवस्थेकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी मागणी डॉ. युवराज येडूरे यांनी केली.


गवतच दिसते चौहीकडे, गेला कालवा कुणीकडे?
Total Views: 10