बातम्या

आता लोकाभिमुख कामाची वेळ – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Now is the time for people oriented work


By nisha patil - 4/10/2025 4:47:44 PM
Share This News:



आता लोकाभिमुख कामाची वेळ – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
 

कोल्हापूर जिल्ह्यात ३१२ जणांना अनुकंपा व सरळ सेवा लिपीक संवर्गातून नियुक्ती

आजरा (हसन तकीलदार) : कोल्हापूर जिल्ह्यातील ३१२ उमेदवारांना अनुकंपा व सरळ सेवेच्या माध्यमातून शासकीय नोकरीची संधी मिळाली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, “आता लोकाभिमुख कामाची वेळ आली आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या संधीचा सदुपयोग करा आणि कर्तव्यनिष्ठेने नागरिकसेवा करा.”
जुलै २०२५ मधील सुधारित अनुकंपा धोरणामुळे कोल्हापूरमधील १६४ जणांना अनुकंपा आणि १४८ जणांना सरळ सेवेतून नियुक्ती मिळाली आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनियुक्तांना शुभेच्छा देत सांगितले की, “आपल्या कामातून यश मिळवून समाजासाठी आदर्श निर्माण करा. ही १०० दिवसांच्या गतिमानता अभियानातील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.”

कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सीईओ कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनियुक्त कर्मचारी शिवानी दळवी यांनी सांगितले, “माझे वडील पाटबंधारे विभागात कार्यरत असताना निधन झाले. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मला अनुकंपा भरतीत नियुक्ती मिळाली. ही संधी शासनाच्या पाठबळाची जाणीव करून देणारी आहे.”


आता लोकाभिमुख कामाची वेळ – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Total Views: 146