ताज्या बातम्या

व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा येथे पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

Nutrition Week concluded with great enthusiasm


By nisha patil - 9/29/2025 3:40:34 PM
Share This News:



व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा येथे पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न 
 

आजरा(हसन तकीलदार):- येथील व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरमध्ये पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका अलकाताई जयवंतराव शिंपी होत्या.        
     

सकस व संतुलित आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य कशा पद्धतीने सुधारते याची सविस्तर माहिती सौ. शिंपी यांनी आपल्या मनोगततून दिली.या कार्यक्रमात 140 पालक महिलांनी  उत्फूर्तपणे भाग घेतला होता.वेगवेगळ्या पदार्थांचे मेजवानी अक्षरशः मुलांना आज भेटली.या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक आर.एच.गजरकर यांनी केले तर  एन.आर.हरेर, डी.बी. डेळेकर ,नगरसेविका सुमैया खेडेकर ,डॉ.पारपोलकर  यांनी आपल्या भाषणात आहारात पालेभाज्यांचे महत्व पटवून सांगितले या कार्यक्रमाला उपस्थित आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका प्रियंकाताई अभिषेक शिंपी 
,व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षिका सौ. व्हि.जे.शेलार ,  ए.एस.गुरव,व्यंकटराव प्राथमिक चे मुख्याध्यापक.आर. व्ही. देसाई,  उपस्थित होते सूत्रसंचालन. एल.पी.कुंभार  यांनी केले तर 
आभार एन.आर. हासबे यांनी मानले.


व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा येथे पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न
Total Views: 106