बातम्या

 ३०० दिवस ३०० मैफिली निक्षय गीत उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

Nutritional support for tuberculosis patients through the 300 Days 300 Concerts Nikshay Geet initiative


By nisha patil - 4/24/2026 12:45:07 PM
Share This News:



 ३०० दिवस, ३०० मैफिली : ‘निक्षय गीत’ उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

 

प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान (निक्षय मित्र) अंतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याच्या उद्देशाने कोल्हापुरात राबविण्यात येत असलेल्या निक्षय गीत मैफिल या नाविन्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाने ३०० मैफिलींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. जिल्हा क्षयरोग केंद्राच्या सहकार्याने जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. जागतिक संगीत दिन (२१ जून २०२५) निमित्त सुरू झालेल्या या उपक्रमाचा कालावधी २० जून २०२६ पर्यंत असून, सलग ३०० दिवसांत ३०० मैफिली आयोजित करून एक वेगळाच आदर्श निर्माण करण्यात आला आहे. 

 

साने गुरुजी वसाहत येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओमध्ये प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी, राजेंद्र चौगुले, नीलांबरी जाधव, प्रीती देसाई, नरहर कुलकर्णी, दिलीप माळी, अभिजीत पाटील, प्रसन्न कुलकर्णी, अमरसिंह राजपूत आदी कलाकार फेसबुक लाईव्ह व प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून या मैफिली सादर करतात. या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून जाणीव फाउंडेशनमार्फत क्षयरुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात येत असून, आतापर्यंत ७९ किटचे वाटप झाले आहे. या उपक्रमासाठी नागरिकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन जाणीव फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुषमा बटकडली यांनी केले आहे.

 

या उपक्रमास मदत करण्यासाठी निधी जनता सहकारी बँक लिमिटेड,पुणे शाखा- शाहूपुरी (IFSC CODE-  JSBP0000029) खाते क्रमांक -029230100006553 या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करावी असे आवाहन जाणीव फाउंडेशन, कोल्हापूर च्या अध्यक्षा श्रीमती सुषमा बटकडली यांनी केली आहे


 ३०० दिवस ३०० मैफिली निक्षय गीत उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ
Total Views: 6