बातम्या

मराठा आरक्षणासोबत ओबीसींवर अन्याय होऊ नये; कोल्हापूरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

OBCs should not be treated unfairly with Maratha reservation


By nisha patil - 9/9/2025 4:31:01 PM
Share This News:



मराठा आरक्षणासोबत ओबीसींवर अन्याय होऊ नये; कोल्हापूरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर (दि. ९ सप्टेंबर २०२५) : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये तसेच ओबीसींना स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि हैद्राबाद गॅझेट रद्द करण्यात यावे, अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

हे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा सौ. स्वाती काळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते ना. छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार हे निवेदन सादर करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे, उपाध्यक्ष अन्नप्पा खामालेहत्ती, शहर अध्यक्ष गब्बर मुल्ला, महिला जिल्हा अध्यक्षा शितल तीवडे, जिल्हा महिला कार्याध्यक्ष राणी गायकवाड, ज्ञानेश्वर सुतार, मंगेश काळे, शोभा कांबळे, गणेश कठडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मराठा आरक्षणासोबत ओबीसींवर अन्याय होऊ नये; कोल्हापूरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Total Views: 114