बातम्या
जनगणनेत ओबीसिंचा समावेश करा नाहीतर निदर्शने करणार-ओबीसी संघटना*
By nisha patil - 5/28/2026 4:02:24 PM
Share This News:
**जनगणनेत ओबीसिंचा समावेश करा नाहीतर निदर्शने करणार-ओबीसी संघटना*
आजरा(हसन तकीलदार)*:-सद्या सुरु असलेल्या जनगणनेमध्ये इतर सर्व जातीसाठी स्वतंत्र कॉलम आहेत परंतु केंद्र सरकार नियोजित जनगणनेमध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवल्याने ओबीसी समाजात तिव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी संघटनेच्यावतीने शुक्रवार दि. 29/05/2026 रोजी दुपारी 01:00 वाजता आजरा तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करणार असलेबाबत आजरा तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
केंद्र सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये हंगामी जनगणना जातनिहाय होईल असे जाहीर केले होते. मात्र जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या गॅझेटमधील 36 प्रश्नांच्या यादीत अनुसूचित जाती (एस. सी.) आणि अनुसूचित जमाती (एस.टी.)साठी स्वतंत्र कॉलम आहेत पण इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी साठी कोणताही स्वतंत्र कॉलम देण्यात आलेला नाही. यासाठी इतर सर्वांना एकच सामायिक कॉलम (रखाना)ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाबाबत ओबीसी समाजात संशयाचे वातावरण निर्माण होऊन असंतोष पसरला आहे. त्यामुळे ओबीसीसाठी स्वतंत्र रखाना करून जनगणना करावी यासाठी उद्या ओबीसी संघटना,आजरा तर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करणार असलेबाबत निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी कॉ. शिवाजी गुरव, कॉ. महादेव सुतार, कॉ. विष्णू केसरकर, रघुनाथ शिंदे आदिजण उपस्थित होते.
जनगणनेत ओबीसिंचा समावेश करा नाहीतर निदर्शने करणार-ओबीसी संघटना*
|