बातम्या
ऑक्टोबर हीटचा कहर : ऊन, पाऊस, गार वारा – हवामानात विचित्र बदल!
By nisha patil - 10/16/2025 3:46:21 PM
Share This News:
ऑक्टोबर हीटचा कहर : ऊन, पाऊस, गार वारा – हवामानात विचित्र बदल!
जागतिक तापमानवाढीचा परिणाम निसर्गातील सर्व घटकांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. निसर्गाचे वेळापत्रकच बदलले आहे. दिवाळी जवळ आली की थंडीची चाहूल लागते, पण यंदा मात्र ऊन, पाऊस आणि गार वाऱ्याचं विचित्र मिश्रण अनुभवायला मिळतंय.
पहाटे हवेत थोडीशी गारवा जाणवतो, तर सकाळी आठपासून ऊन तापायला सुरुवात होते. दुपारी दोननंतर तर उन्हाचा चटका बसल्यासारखा भासतो. मात्र संध्याकाळ होताच पुन्हा थंड वाऱ्याची चाहूल, आणि कधी पावसाची सरही.
या “ऑक्टोबर हीट”मुळे दिवसभर तापमानात चर–उतार जाणवतो. तापमानाचा आकडा जरी फारसा बदलत नसला तरी वातावरणातील हा बदल जाणवण्याजोगा आहे. परतीच्या पावसाच्या सरींमुळे ऊन–पाऊस–गारवा असं थरारक हवामान तयार झालं आहे.
हवामानातील या अस्थिरतेचा परिणाम आरोग्यावरही दिसून येत असून ताप व सर्दीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
ऑक्टोबर हीटचा कहर : ऊन, पाऊस, गार वारा – हवामानात विचित्र बदल!
|