बातम्या

कोल्हापुरी चप्पल GI टॅगचे अधिकृत स्वामित्व केवळ लिडकॉम व लिडकरकडेच – अधिकृत स्पष्टीकरण

Official ownership of Kolhapuri Chappal GI tag


By nisha patil - 1/8/2025 4:32:52 PM
Share This News:



कोल्हापुरी चप्पल GI टॅगचे अधिकृत स्वामित्व केवळ लिडकॉम व लिडकरकडेच – अधिकृत स्पष्टीकरण

मुंबई, दि. १ : कोल्हापुरी चप्पल या पारंपरिक पादत्राणास मिळालेल्या GI (Geographical Indication) टॅगचे अधिकृत व कायदेशीर स्वामित्व केवळ लिडकॉम (LIDCOM) आणि लिडकर (LIDKAR) या दोन शासकीय महामंडळांकडेच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जून २०२५ मध्ये ‘प्राडा’ या आंतरराष्ट्रीय ब्रँडने आपल्या ‘स्प्रिंग/समर कलेक्शन’मध्ये सादर केलेल्या सँडल डिझाइनवरून वाद निर्माण झाला. त्यात कोल्हापुरी चप्पलसारख्या डिझाइनचा वापर झाल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर दाखल झालेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने १६ जुलै रोजी फेटाळली आणि स्पष्टपणे नमूद केले की, फक्त GI टॅगचे नोंदणीकृत धारक असलेल्या लिडकॉम व लिडकरलाच कायदेशीर कारवाईचा अधिकार आहे.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लिडकॉमच्या प्रेरणा देशभ्रतार आणि लिडकरच्या के. एम. वसुंधरा यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकात म्हटले की,“प्राडा किंवा तत्सम कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थांशी संवाद साधण्याचा किंवा प्रतिनिधित्व करण्याचा कोणालाही अधिकार नाही.”

लिडकॉम व लिडकर यांचा उद्देश कोल्हापुरी चप्पलची ओळख जागतिक पातळीवर प्रस्थापित करण्याबरोबरच हजारो चर्मकार कारागिरांचे हक्क व परंपरेचे रक्षण करणे हाच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


कोल्हापुरी चप्पल GI टॅगचे अधिकृत स्वामित्व केवळ लिडकॉम व लिडकरकडेच – अधिकृत स्पष्टीकरण
Total Views: 86