विशेष बातम्या
तावडे हॉटेलजवळील जुनी स्वागत कमान धोकादायक; आज रात्री पाडण्यात येणार
By nisha patil - 6/11/2025 4:16:24 PM
Share This News:
तावडे हॉटेलजवळील जुनी स्वागत कमान धोकादायक; आज रात्री पाडण्यात येणार
वाहतूक उचगाव व शिये मार्गे वळवली जाणार
कोल्हापूर (प्रतिनिधी) – विभागीय कार्यालय क्र. ४, ताराराणी मार्केट परिसरातील तावडे हॉटेल येथील जुनी स्वागत कमान धोकादायक स्थितीत असल्याचे स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत हडकर यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले आहे. त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांनी कमान पाडण्याचे आदेश दिले आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई आज, गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने तात्पुरती वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे.
➡ कोल्हापुरात येणारी वाहतूक – तावडे हॉटेल मार्ग बंद ठेवून उचगाव मार्गे वळवण्यात येणार आहे.
➡ शहराबाहेर जाणारी वाहतूक – छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोड–शिये मार्गे वळवण्यात येईल.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या कालावधीत वाहतूक बदलांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
तावडे हॉटेलजवळील जुनी स्वागत कमान धोकादायक; आज रात्री पाडण्यात येणार
|