खेळ
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत शहाजी कॉलेजच्या ओमकार पाटील ला कास्यपदक
By nisha patil - 1/22/2026 12:03:58 PM
Share This News:
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत
शहाजी कॉलेजच्या ओमकार पाटील ला कास्यपदक
कोल्हापूर :- चंदीगड युनिव्हर्सिटी, मोहाली, पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत येथील शिवाजी विद्यापीठ व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा खेळाडू ओमकार एकनाथ पाटील यांनी ग्रीको रोमन प्रकारात ७२ किलो वजनी गटात कास्यपदक पटकाविले. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातील अखिल भारतीय स्तरावर ओमकार हा एकमेव पदक विजेता खेळाडू ठरला.
पदक विजेता ओमकारला शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी प्र -कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, रजिस्टार डॉ. व्ही. एन. शिंदे आणि क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे व्हॉइस चीफ पेट्रन व चेअरमन मा. मानसिंग बोंद्रे दादा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवान यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत शहाजी कॉलेजच्या ओमकार पाटील ला कास्यपदक
|