बातम्या
खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्यांना दीपावली निमित्त झाले नव्या कपड्यांचे वाटप
By nisha patil - 12/11/2026 10:39:46 PM
Share This News:
खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्यांना दीपावली निमित्त झाले नव्या कपड्यांचे वाटप
खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यातील एक भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्यांना, दीपावली निमित्त नवे कपडे वाटप करण्यात आले.
दिवाळीनिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने, विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कसबा बावड्यातील राजाराम कारखाना कार्यस्थळावरील ऊस तोडणी कामगारांना सोमवारी फराळ आणि कपड्याचे वाटप करण्यात आले. तर बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये काम करणार्या २१० कर्मचार्यांना, नव्या कपड्यांचे वाटप करण्यात आले.
सौ. अंजली विश्वराज महाडिक यांच्या हस्ते सर्व कर्मचार्यांना शुभेच्छा देवून कपडे वाटप करण्यात आले. पुरुष कर्मचार्यांना शर्ट आणि पॅन्ट पीस, तर महिला कर्मचार्यांना साडीचं वितरण करण्यात आले. यावेळी व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्यांना दीपावली निमित्त झाले नव्या कपड्यांचे वाटप
|