बातम्या

सपकाळ कुटूंबियांच्यावतीनं कोल्हापुरातील ५ तालमींना पैलवान ग्रंथालय उपक्रम भेट

On behalf of the Sapkal family


By nisha patil - 11/21/2026 10:15:46 PM
Share This News:



तालीम संस्था केवळ शरीर कमावण्याची फॅक्टरी नव्हे तर सुसंस्कृत बनण्याचे विद्यापीठ, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
 

सपकाळ कुटूंबियांच्यावतीनं कोल्हापुरातील ५ तालमींना पैलवान ग्रंथालय उपक्रम भेट

कुस्तीगिरांना शक्तीसोबत युक्तीचीही गरज असते. केवळ शरीर कमवून चालणार नाही, तर त्याला बुध्दीची जोड द्यावी लागेल. तसेच बदलत्या कुस्तीचे बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. तालीम संस्था या फक्त शरीर कमावण्याची फॅक्टरी नव्हे, तर सुसंस्कृत बनण्याचे विद्यापीठ असल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. पुण्यातील वंदना सपकाळ यांच्या एकसष्ठीनिमित्त, पैलवान ग्रंथालय लोगो अनावरण आणि कोल्हापुरातील ५ तालमींना पैलवान ग्रंथालय भेट उपक्रमावेळी ते बोलत होते.
 

पुण्यातील सौ. वंदना दत्तात्रय सपकाळ उर्फ माई यांच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचे सुपूत्र गिरीष सपकाळ यांनी कोल्हापुरातील पाच तालमींमध्ये ग्रंथालय सुरू करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाचे आणि त्याच्या लोगो अनावरणाचा कार्यक्रम, शाहू स्मारक भवन मध्ये पार पडला. खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते आणि वंदना सपकाळ, गिरीष सपकाळ, नगरसेवक राजू लाटकर, वस्ताद आबा मुंडे, राम सारंग, दत्ताबाळ चव्हाण यांच्या उपस्थितीत, पैलवान ग्रंथालयाच्या लोगोचे अनावरण झाले. गिरीष सपकाळ यांनी या उपक्रमामागचा हेतू स्पष्ट केला. वस्ताद राम सारंग यांनी कुस्तीत झालेले बदल, व्यसनाधिनता, सप्लीमेंटच्या किंवा अंमली पदार्थांच्या सेवनामुळे पैलवानांचे आयुष्य उध्वस्त होते, याकडे लक्ष वेधले. तालमीमुळे शरीर घडते.

आता सपकाळ कुटूंबियांच्या उपक्रमामुळे पैलवानांची बुध्दीही घडेल, अशी अपेक्षा दत्ताबाळ चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यानंतर दत्तात्रय सपकाळ आणि वंदना सपकाळ यांचा खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुस्तीच्या तालमीत ग्रंथालय ही नवी संकल्पना गिरीष सपकाळ यांच्यामुळे नव्यानं समोर आली. या ग्रंथालयात विविध महापुरूषांची चरित्र ग्रंथ असतील, तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम, आहार विषयक पुस्तकांचा समावेश असेल. केवळ शरीर कमावणे नको, तर बुध्दीचा विकास देखील गरजेचे असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी वस्ताद शिवाजी पाटील आणि माजी खासदार निवेदिता माने यांचेही भाषण झाले. तर जयभवानी तालीम, राजर्षि शाहू कुस्ती केंद्र, राष्ट्रकुल कुस्ती संकुल, स्वर्गीय सदाशिव मंडलिक तालीम, करवीर कुस्ती संकुलाला ग्रंथालय लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी हंगेश्वर धायगुडे, पैलवान असिफ नदाफ, बबन बोराडे, राजेश काकडे, रामभाऊ पाटील, कादर मलबारी, ईश्वर परमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


सपकाळ कुटूंबियांच्यावतीनं कोल्हापुरातील ५ तालमींना पैलवान ग्रंथालय उपक्रम भेट
Total Views: 5