बातम्या
विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!
By nisha patil - 10/20/2026 11:28:29 PM
Share This News:
विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर
सातारा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना विजयी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रचाराने वेग घेतला आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मतदारांच्या गृहभेटी घेत, त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन करत जिल्ह्यातील शिक्षकांनी ही निवडणूकच आपल्या हातात घेऊन प्रचाराची धुरा अधिक जोमाने चालवली आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सातारा जिल्ह्यात नियोजनबद्ध प्रचारावर विशेष भर देण्यात येत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा जिल्हा प्रमुख श्री. शशिकांत काटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी विजयादशमीच्या औचित्याने मतदारांशी थेट संपर्क साधला. गृहभेटींच्या माध्यमातून शिक्षक मतदारांशी संवाद साधण्यात आला. प्रत्यक्ष भेट शक्य न झालेल्या मतदारांना दूरध्वनीद्वारे दसऱ्याच्या शुभेच्छा देत मतदानाचे आवाहन करण्यात आले.
प्रचार मोहिमेअंतर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा जिल्हा सहविभाग प्रमुख प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश नलवडे, डॉ. दीपक जाधव, सातारा टी.डी.एफ.चे अध्यक्ष रवींद्र यादव, मेजर प्रा. मोहन वीरकर आणि प्रा. डॉ. राठोड यांनी यशोदा संकुल येथे श्री. दशरथ सगरे यांची भेट घेऊन कौस्तुभ गावडे यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान संकुलातील शिक्षक मतदारांशी संवाद साधण्यात आला. कौस्तुभ गावडे यांच्या कार्याची आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांच्या भूमिकेची माहिती देत त्यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी सक्षमपणे प्रतिनिधित्व करू शकणारे नेतृत्व विधान परिषदेत पोहोचावे, या भूमिकेतून कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
सातारा जिल्ह्यातील शिक्षकांनी वैयक्तिक संपर्काला प्राधान्य देत प्रचाराचे नियोजन केले आहे. गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि प्रत्यक्ष संवाद अशा विविध माध्यमांतून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठीची बांधिलकी अधोरेखित झाली.
शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने यांना विधान परिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात प्रचाराची धडाकेबाज वाटचाल सुरू आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!
|