बातम्या
खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर रामचरितमानस गानचे प्रसारण सुरू
By Administrator - 11/4/2025 5:06:09 PM
Share This News:
खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर रामचरितमानस गानचे प्रसारण सुरू
समस्त भारत वर्षाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांची जयंती नुकतीच भक्तीभावाने साजरी झाली. अयोध्येत रामलल्ला चे मंदिर उभारल्यानंतर देशभरात रामनवमीचा उत्साह काही वेगळाच होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सह देशभरात रामनवमीनिमित्त अनेकविध उपक्रम पार पडले.
अशावेळी कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर श्री राम चरित्र मानसगानचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि निर्देशानुसार जिल्ह्यातील तमाम जनतेला प्रभू श्रीरामांच्या आदर्श संस्कारांचा आणि विचारांचा वारसा मिळावा तसेच घराघरात श्रीराम भक्ती वाढावी यासाठी कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर सुनील गायकवाड यांचा विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
त्यानुसार रोज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर तुलसीदास कृत रामचरित मानस गान या कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले आहे. कोल्हापुरातील तमाम श्रीराम भक्तांनी आणि श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर रामचरितमानस गानचे प्रसारण सुरू
|