विशेष बातम्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेच्या ड्रेनेज कर्मचारी बांधवांचा सत्कार

On the occasion of Independence Day

By nisha patil - 8/16/2025 2:35:11 PM
Share This News:

स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेच्या ड्रेनेज कर्मचारी बांधवांचा सत्कार

कोल्हापूर,  : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम आदमी पार्टीतर्फे कोल्हापूर महानगरपालिका विभागीय वार्डातील ड्रेनेज लाईनमधील रोडिंग काम करणाऱ्या मेहनती कर्मचारी बांधवांचा छोटासा सत्कार करण्यात आला. शहराच्या स्वच्छतेसाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या या कर्मचारी बांधवांच्या कार्याला सलाम करत त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
 
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डायमंड हॉस्पिटल, कोल्हापूरचे डॉ. विलास नाईक होते. त्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेच्या ड्रेनेज कर्मचारी बांधवांचा सत्कार
Total Views: 65