बातम्या
शाही दसरा महोत्सवानिमित्त - उद्या शौर्यगाथा व मिरवणूक
By nisha patil - 1/10/2025 3:37:57 PM
Share This News:
शाही दसरा महोत्सवानिमित्त - उद्या शौर्यगाथा व मिरवणूक
कोल्हापूर, दि. 1 : कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव 2025 अंतर्गत उद्या गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता भवानी मंडप येथे ‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ हा विशेष कार्यक्रम होणार असून ऐतिहासिक नगारखान्यास यंदा 191 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंगलतोरण बांधण्यात येणार आहे.
दुपारी 4 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर कोल्हापूरची परंपरागत शाही दसरा मिरवणूक निघणार आहे. तसेच न्यु पॅलेस ते दसरा चौक या मार्गावर शाही स्वारीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
शाही दसरा महोत्सवानिमित्त - उद्या शौर्यगाथा व मिरवणूक
|