विशेष बातम्या
One Day for Baliraja...‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांत पालकमंत्री आबिटकरांचा शिवार दौरा
By nisha patil - 5/7/2025 8:13:56 PM
Share This News:
‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांत पालकमंत्री आबिटकरांचा शिवार दौरा
राधानगरी, दि. ५ जुलै : भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून प्रत्यक्ष भात लागवड करत कोल्हापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमात सहभाग घेतला. राधानगरी तालुक्यातील अनंत चौगुले यांच्या शेतात त्यांनी चिखलात उतरून भात रोपे लावली.
डोक्यावर छत्री नव्हती, पण हातात मात्र पिकवाटेचं बळ होतं. झुणका-भाकरीचा आस्वाद घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये शिवार फेरी, शेती शाळा, वृक्षारोपण, कृषी योजनांचे मार्गदर्शन असे उपक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे “शेतीच्या बांधावर प्रशासन” नेण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याची भावना कृषी क्षेत्रात व्यक्त होत आहे.
One Day for Baliraja...‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांत पालकमंत्री आबिटकरांचा शिवार दौरा
|